कोणत्या महिन्यात काय शिकवायचे ? याचे नियोजन

शिक्षण विभागाची दिशादर्शिका
कोणत्या महिन्यात काय शिकवायचे ? याचे नियोजन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवसेंदिवस खासगी शाळांना मागे टाकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिकदृष्ट्या पायाभूत बदल करण्यात येत आहेत. यातील अनेक बदल हे राज्य पातळीवरून तर काही बदल हे जिल्हा परिषद पातळीवर करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी, चौथी, पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षीच्या अध्यापनाची दिशा ठरवण्यासाठी दिशादर्शिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी याबाबत सूचना दिलेल्या असून त्यांच्या सुचनांना रोल मॅाडेल ठेवून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या मराठी शाळांसाठी दिशादर्शक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात इयत्ता तिसरी, चौथी, पाचवी आणि इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्यापन निश्चित करण्यात येणार आहे. वर्षभर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर फोकस करावा, जेणे करून पुढील इयत्तेतला त्या अध्यापनाचा आणि मिळालेल्या ज्ञानाचा फायदा होईल, याचा विचार करण्यात आला आहे.

यासाठी इयत्ता तिसरी, चौथी, पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या संभाव्य परीक्षांचे संभाव्य नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच इयत्ता इयत्ता तिसरी, चौथी, पाचवी आणि इयत्ता सहावीच्या वर्षभरासाठी पाच आणि इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा प्रश्नपत्रिकांचा संच तज्ज्ञ शिक्षकांकडून तयार करण्यात आलेला आहेत.

या उपक्रमात प्रत्येक तालुक्यातून दोन समन्वयक शिक्षक अथवा अधिकारी यांची नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक विषयासाठी सात शिक्षक प्रत्येक तालुक्यात कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यात एकूण 170 तज्ज्ञ शिक्षक नेमण्यात येणार असून उर्दू विषयासाठी 3 समन्वयक शिक्षक नेमण्यात येणार आहेत.

राज्याच्या शिक्षण आयुक्त यांच्या संकल्पनेवर आधारीत नगर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी वर्षभरासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी दिशार्शिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे वर्षभराच्या शिक्षणाचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

- आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी झेडपी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com