शाळा पुन्हा सुरु होणार; नव्याने शासन निर्णय जारी

नव्याने नियंत्रण समिती जाहीर
शाळा पुन्हा सुरु होणार; नव्याने शासन निर्णय जारी

संगमनेर | वार्ताहर

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) आठवी ते बारावी शाळा (8th to 12th school) सुरू करण्यासंदर्भात यापूर्वी शासन निर्णय जारी केला होता. तथापि तो शासन निर्णय २४ तासाच्या आत मागे घेण्यात आला. मात्र शासनाने आज पुन्हा नव्या सूचना देऊन सुरू करण्या संदर्भाने आदेश दिले आहेत.

ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील (Covid free village) ग्रामपंचायतीने गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी. सरपंच, तलाठी, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामसेवक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा घडवून आणावी.

शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित गावात कोविड रुग्ण (Covid patient) आढळून आला नसावा. शिक्षकांचे लसीकरण (vaccination) प्राधान्याने करणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

विद्यार्थी कोविडग्रस्त (Covid19 positive) झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थीचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकान्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.शाळा सुरू करताना मुलांना टप्या टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या विषयांसाठी प्राधान्य इ.

कोविड संबंधी सर्व नियमांचे (covid rules) काटेकोरपणे पालन करावे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे. मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच करोना चाचणी करावी.

संबंधीत शाळेतील शिक्षकांची (school teachers) राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

वरील सर्व बाबींचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे सूचना कराव्यात. असेही आदेश देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com