‘फोडणी’ महागली खाद्यतेलाचे दर भडकले

‘फोडणी’ महागली खाद्यतेलाचे दर भडकले

अहमदनगर | Ahmednagar

इंधन दरवाढीपाठोपाठ आता खाद्यतेलही महागलंय. गेल्यावर्षी 1 एप्रिलच्या तुलनेत खाद्यतेलाच्या 15 किलो डब्याचे दर वर्षभरात तब्बल हजार रुपयांची वाढ झालीय.

शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, पामतेल, सोयाबीन तेलाच्या किमती भडकलेल्या दिसताहेत. भारत 80 टक्के तेल आयात करतो. इंडोनेशिया, मलेशिया, अर्जेंटिना, ब्राझील, यूक्रेनमधून आपण तेल आयात करतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तुटवडा असल्यानं तेलाचे भाव तेजीत आहेत. शिवाय, चीननंही युद्धाची तयारी म्हणून तेलाची साठवणूक केली. त्यामुळे आपल्या जेवणाच्या ताटातली फोडणी मागील वर्षभरात दुपटीनं महागली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com