खाद्यतेलाचा अपहार करणारा गजाआड

एलसीबीची नगर शहरात कामगिरी
खाद्यतेलाचा अपहार करणारा गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

30 लाख रुपये किमतीच्या खाद्य तेलाचा अपहार (Edible oil Fraud) केलेल्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Local Crime Branch) नगर शहरातील एकविरा चौकात अटक (Ekvira Chowk Arrested) केली. किशोर मारूती पडदूने (वय 32 रा. बजाजनगर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. खाद्य तेलाच्या अपहार प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangmner Police Station) फिर्याद दाखल आहे.

गुजराथ राज्यातील (Gujrat State) सुरतमधून ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये सोयाबीन खाद्य तेलाचे डबे भरून सदरचा माल पुणे येथे पोहच करण्यासाठी दोघेजण निघाले होते. ट्रक चालक अरुण उदमले (रा. पोखरी हवेली ता. संगमनेर) व अफजलखान साहेबखान पठाण (रा. मोमीनपुरा, संगमनेर) यांनी सदरचा ट्रक पुणे येथे पोहच न करता त्याचा अपहार केला होता.

याप्रकरणी अशोककुमार चौधरी (रा. सुरत) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना किशोर पडदूने हा गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. तो नगर शहरातील एकविरा चौकात भाड्याने फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके (PI Anil Katke) यांना मिळाली होती. त्यांनी पथक पाठवून पडदूने याला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com