‘ई पीक पाहणी‘ नोंदणीसाठी सर्वांनी सहकार्य करा

अनिल पवार : श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे महसूलचे ‘ई’ पीक पाहणीचे मार्गदर्शन शिबिर
‘ई पीक पाहणी‘ नोंदणीसाठी सर्वांनी सहकार्य करा

भोकर |वार्ताहर| Bhokar

‘ई’ पीक पाहणी (E-Pik Pahani) प्रत्येक शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची आहे, यात पाण्याची सुविधा, नेटशेड किंवा इतर बाबींची नोंदी करायच्या आहेत. त्यामुळे शासनदरबारी आपल्या शेतातील सर्व माहिती पोहचणार असून त्यानुसार सरकारला नियोजन करणे सोपे होणार आहे. या ‘ई’ पीक पाहणीचे (E-Pik Pahani) काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार (Sub-Divisional Officer Anil Pawar) यांनी केले.

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) श्रीक्षेत्र गणेशखिंड (Shri Shetra Ganeshkhind) येथे परिसरातील कारेगाव (Karegav), खोकर (Khokar), भोकर (Bhokar, टाकळीभान (Takalibhan), वांगी (Vangi), खिर्डी (Khirdi), गुजरवाडी (Gujarwadi), कारवाडी (Karwadi), भेर्डापूर (Bherdapur), चारी क्र. 12 येथील शेतकर्‍यांना शासनाच्या ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदणार माझा पीक पेरा’ या संदर्भातील ‘ई पीक पाहणी’ (E-crops Pahani) बाबत मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील (Tahsildar Prashant Patil), किसन महाराज पवार, कृष्णा महाराज मते, अंबादास महाराज वाकडे, संदीप महाराज, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, श्रीक्षेत्र गणेशखिंड देवस्थानचे बाळासाहेब ओझा, बजरंग दरंरदले, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष पटारे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नानासाहेब रेवाळे, राजेंद्र कोकणे, अशोकचे संचालक दिगंबर तुवर, रामदास पटारे, जालींधर होले, किरण धुमाळ, दत्तात्रय पवार, राधु मोटे, रमेश पवार, भाऊसाहेब काकणे, शिवाजी पवार, निलेश ओझा, मंडलाधिकारी प्रशांत ओहोळ आदी प्रमुख उपस्थित होते.

येत्या दि.2 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकर्‍यांना सातबारा उतारा घर पोहच केला जाणार आहे. तो सर्वांनी तपासणी करून काही दुरूस्ती असल्यास त्वरीत दुरूस्ती करून घ्यावी तसेच सर्व शेतकर्‍यांनी वेळच्यावेळी आपल्या सातबारा उतार्‍यावरील नोंदींची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रथम या ‘ई पीक पाहणी’ बद्दलचे गैरसमज दूर ठेवा, यात कुठलेही नुकसान नाही, तर त्यामुळे आपली खरी पीक पाहणीची नोंद होणार आहे. त्याचबरोबर आपल्या शेती सुविधांच्या इतर नोंदीही याच अ‍ॅपमधून होणार आहेत, त्यासाठी शेतकरी युवकांनी पुढाकार घेऊन टीम तयार करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, यामुळे सरकारला शेतकर्‍यांसाठी राबवायच्या असलेल्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविणे सोपे होणार आहे, तर नुकसानीच्या वेळीही हीच खरी पीक पाहणी आपल्यापर्यंत मदत पोहचविणार आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील (Tahsildar Prashant Patil) यांनी दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) हे शेतकर्‍यांसाठी आवश्यक असलेले महसुलातील अनेक अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत, त्यांच्या कार्यप्रणालीमुळे शेतकर्‍यांच्या सातबारावरील इतर अनावश्यक नोंदी उडून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला. सर्व शेतकर्‍यांनी लवकरात लवकर आपले ई पीक पाहणीचे (E-Crops Pahani) रजिस्ट्रेशन करून शेतीतील सर्व नोंदी ऑनलाईन कराव्यात.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वरद गजानन हे जागृत देवस्थान आहे. बाप्पा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे, सर्वांची पिकं चांगली येऊ दे त्याच बरोबर करोनातून सर्वांची मुक्ती होऊ दे असे आवाहन यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचीन गुजर यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याणराव लकडे यांनी केले. या कार्यक्रमास कामगार तलाठी अशोक चितळकर, अरुण हिवाळे, आकांक्षा डोखे, वांगीच्या ग्रामसेविका शितल बाचकर, खिर्डीचे सरपंच प्रभोकर कांबळे, वांगी बुद्रुकचे सरपंच जगन्नाथ बिडगर, वांगी खुर्दचे सरपंच काकासाहेब साळे, गुजरवाडीचे सरपंच अमोल गुजर, जयराम ठाकर, योगेश शेळके, उमेश गोटे, किरण धुमाळ, बाळासाहेब बेरड, राजेंद्र राहींज, बाबासाहेब वाकडे आदींसह पंचक्रोशीतील प्रमुख शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com