दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांच्या नगर ते मुंबई पदयात्रेचे आज प्रस्थान

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांच्या नगर ते मुंबई पदयात्रेचे आज प्रस्थान

उंबरे |वार्ताहर| Umbare

शिवसेनेच्या मुंबईत शिवाजी पार्क येथे होणार्‍या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण नगर जिल्ह्यातून शिवसेनेचे दक्षिण नगर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली नगर ते मुंबई निष्ठावंत शिवसैनिकांच्या पदयात्रेचे आज 26 सप्टेंबर रोजी प्रस्थान होणार असल्याची माहिती जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेकडे ठाकरे व शिंदे या दोन्ही गटाने शिवाजी पाकर्र्वर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. महानगरपालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारल्याने ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या लढाईत ठाकरे गटाने बाजी मारल्याने निष्ठावंत शिवसैनिकांनी हा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्याचा निर्धार केला आहे.

हा मेळावा आजपर्यंतचे गर्दीचे सर्व विक्रम मोडित काढणार असून त्याच धर्तीवर अहमदनगर जिल्ह्यातून पायी पदयात्रेत 500 निष्ठावंत शिवसैनिक व इतर वाहनांनी 10 हजार शिवसैनिक पायी जाणार असल्याची माहिती कार्ले यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com