धडक मोहिमेत १५ ग्राहकांची वीजचोरी पकडली

२ लाख ३४ हजारांच्या वीजचोरीची ५९ हजार तडजोड रक्कम
धडक मोहिमेत १५ ग्राहकांची वीजचोरी पकडली

नेवासा (तालुका वार्ताहर)

नेवासा शहरात वीज गळती कमी करण्यासाठी व अधिकृत वीजग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडून धडक वीजचोरी शोध मोहीम राबविण्यात...

येत असून या अंतर्गत १५ ग्राहकांची १३ हजार ५६८ युनिट्सची वीजचोरी शोधण्यात पथकाला यश आले. या २ लाख ३३ हजार ६०० रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी ५९ हजार रुपये तडजोड आकारणी रक्कम निश्चित करण्यात आली.

वीजचोरी शोध मोहिम कारवाईमुळे नेवासा शहरात वीजचोरांचे धाबे दणाणले असून अधिकृत व नियमित वीजबिल भरणाऱ्या वीज ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरील मोहीम अहमदनगर ग्रामिण विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा उपविभाग उपकार्यकारी अभियंता शरद चेचर, सहाय्यक अभियंता मनोहर पाटील, सहाय्यक अभियंता राकेश भंगाळे, निम्नस्तर लिपिक मेहल बोर्डे व नेवासा शहर कक्ष लाईनस्टाफ राबवत आहे.

वीजचोरी करण्यापेक्षा नियमाप्रमाणे अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करून महावितरण कडून अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Stories

No stories found.