दुर्गापुरात 3 शेळ्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी

दुर्गापुरात 3 शेळ्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) दुर्गापूर (Durgapur) येथील खळवाडी भागात रात्री बिबट्याने (Leopard) केलेल्या हल्ल्यात (Attack) तीन शेळ्या ठार (Goats Death) झाल्या.

दुर्गापुरात 3 शेळ्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी
अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते ?

रात्री अडीच ते तीनच्या सुमाराला या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला (Leopard Attacks Goats) केला. मोलमजुरी करून पोट भरणारी ही भटकी गवळी मंडळी या ठिकाणी राहते. आवाजाने जाग आल्यावर बाहेर आले असता तीनही शेळ्या (Goats) शेवटचा श्वास घेताना दिसल्या. तसेच अंधारात बिबट्या (Leopard) जाताना दिसला. सचिन पन्नालाल गवळी यांच्या दोन तर राहुल रामभाऊ गवळी यांची एक शेळी बिबट्याच्या (Leopard) भक्ष्यस्थानी पडली.

दुर्गापुरात 3 शेळ्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी
भंडारदरात पावसाचा जोर, मुळा 81 टक्के

दुर्गापूरचे पोलीस पाटील दिलीप पुलाटे यांनी सकाळी याबाबतची माहिती वन विभाग (Forest Department) व सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना लोणी (Loni) यांना दिली. दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी कुणीही फिरकलेले नाही. फोनवर संपर्क केला असता आम्ही निघालो आहोत आम्ही येत आहोत अशी मोघम उत्तरे मिळाली. रोजंदारीवर काम करणारी मंडळी दिवसभर बसून होती. घरातील व्यक्ती गमविल्याचे दुःख त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होते. दोन्ही घरच्या चुली बंद दिसून आल्या. सरकारी अधिकार्‍यांनी दाखविलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. उशीर झाल्याने शेळ्या फुगल्या असून नाकातून स्राव बाहेर वाहत आहे.

दुर्गापुरात 3 शेळ्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी
सहकार, समाजकारण आणि राजकारणात विखेंचा दबदबा

बिबट्याने गावात धुमाकूळ घातला असून दररोज गावातील कुत्रे किंवा जनावरे यांच्यावर हल्ला मारताना दिसत असून या ठिकाणी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी पोलीस पाटील दिलीप पुलाटे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com