सुरेगावात डुप्लिकेट दारुच्या शोधात आलेले उत्पादन शुल्क पथक रिकाम्या हाताने परतले

सुरेगावात डुप्लिकेट दारुच्या शोधात आलेले उत्पादन शुल्क पथक रिकाम्या हाताने परतले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपूर पथक क्रमांक एकने मंगळवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात काहीच अवैध बनावट मुद्देमाल आढळून न आल्याने पथकास रिकाम्या हाताने परतावे लागले. या कारवाई बाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपूर पथक क्रमांक हे मंगळवारी दुपारच्या सुमारास वाहन क्रमांक एमएच-17 एएन-0011 सुमो शासकीय वाहन सुरेगावात दाखल झाले.एका नागरिकाच्या घरामध्ये बनावट दारू तयार होत असल्याच्या ऑनलाईन तक्रार अर्जावरून टाकलेल्या छाप्यात पथकास काहीच आढळून न आल्याने पंचनाम्यावर समाधान मानत रिकाम्या हाताने परतले.

राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई येथे राज्यातील ऑनलाईन तक्रारी नोंदण्यासाठी विभाग स्थापन करण्यात आला आहे. तक्रार ज्या कार्यक्षेत्रातील असेल तेथील अधिकारी यांनाच तक्रारीचे निरसन करण्यासाठी पाठवले जाते. या शासनाच्या भूमिकेमागचे इंगित काय हे नागरिकांना न उमजलेले कोडे आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून देशी विदेशी दारू जप्त केली होती. ती बनावट दारू कोपरगाव तालुक्यात विक्री झाली असल्याचा नाशिक उत्पादन शुल्क विभाग यांना संशय असल्याने या भागात कायम छापे पडत असतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com