डंपरच्या धडकेने पत्रकार तरुणीचा जागीच मृत्यू

डंपरच्या धडकेने पत्रकार तरुणीचा जागीच मृत्यू

पारनेर |प्रतिनिधी| Parner

कान्हूरपठार- टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर भरधाव डंपरने स्कुटीला जोराची धडक दिल्याने संपदा सुरेश साळवे (वय 26) या पत्रकार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वाजण्याच्या सुमारास कान्हूर पठार येथून मोकळा डंपर भरधाव वेगाने चालला होता.

डंपरने टाकळी ढोकेश्वर घाटात स्कुटीला जोराची धडक दिली. त्यात पत्रकार तरुणीचा मृत्यू झाला. माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या संख्येने वाळू तस्करांची मोठी गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डंपर चालकाच्या मालकाच्या दुसर्‍या डंपरने चार वर्षांपूर्वी असेच चिरडले होते. त्यावेळी डंपर मालकाने पाच लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर मदतीस नकार दिला देऊन गरीब कुटुंबाला वार्‍यावर सोडून दिले. यावेळीही वाळूतस्कराकडून तडजोडीचे प्रयत्न असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com