आरोग्य विभागाच्या पेपरला डमी विद्यार्थी

जिल्ह्यात कुठे घडला प्रकार?
आरोग्य विभागाच्या पेपरला डमी विद्यार्थी

अहमदनगर|Ahmedagar

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या

'क' वर्ग पद भरतीमध्ये डमी विद्यार्थी आढळ्याचा प्रकार नगर शहरामध्ये उघडकीस आला आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शहरातील प्रेमराज सारडा महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे.

एक मुळ परीक्षार्थी, एक डमी विद्यार्थी, त्यांना मदत करणारा एक व्यक्ती अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. सर्व जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. राज्यात आज आरोग्य विभागाचा पेपर होत आहे. जिल्ह्यात २९ केंद्रावर ही परीक्षा होत असून त्यासाठी १७ हजार ८१२ विद्यार्थी बसले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com