गोरक्षक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुप्यात बारा गायीचे प्राण वाचले
सार्वमत

गोरक्षक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुप्यात बारा गायीचे प्राण वाचले

माऊली कृपा गोशाळेत कत्तंलखाण्यातुन वाचलेले २३ जनावरे दाखल

Nilesh Jadhav

सुपा | वार्ताहार | Supa

गोरक्षक व पोलिसांच्या संतर्कतेमुळे दोन घटनातुन कत्तलखानात जाणारी २३ गोवंश शहाजापुरच्या माऊली कृपा गोशाळेत आली. एक सुपा येथे रेड टाकून १२ जनावरे वाचवली तर ११ जनावरे नगर येथुन सोडून आणली आहे.

पारनेर तालुक्यातील सुपा येथील दौलत पेट्रोल पंपाजवळ बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून सुपा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन ६८ हजार रूपये किंमतीचे एकूण १२ जनावरे ताब्यात घेतली. याबाबत सुपा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आर. एस. पटेल यांच्या फिर्यादीवरून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आबिद नजीर शेख यांच्या विरोधात महाराष्ट्र अँनिमल प्रिझर्वेशन अँक्ट कलम ५(ब)व ९ प्राण्याचा छळ प्रती. अधि.सन १९६० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार पोना चौधरी हे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com