रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे युवकाला मिळाले जीवदान

चालत्या रेल्वेतुन पडून झाला होता जखमी
रेल्वे
रेल्वे

रांजणगाव देशमुख | वार्ताहर

रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे हिंगोलीतील युवकाला जीवदान मिळाल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे. शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात धावत्या रेल्वेतून पडून एक इसम गंभीर जखमी होऊन त्याच्या पायाला दुखापत झाली होती. याबाबत कोणाला काही माहित नसल्याने व गंभीर जखमी असल्याने सदर इसम रेल्वे पटरीच्या बाजूला रात्रभर पडून होता.

सकाळ उजाडलं तरीही आसपास कोणी मदतीला दिसेना मात्र तेवढ्यात आज रविवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकमन आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांना रेल्वे मार्गाजवळ एक इसम जखमी अवस्थेत सापडला असल्याचं दिसलं व त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेतून या इसमाला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात पाठविले व त्याला जीवदान दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील लक्ष्मणवाडी रोड साडेचार किलोमीटर रेल्वे मार्गावर असून रविवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान एक ३५ वर्ष युवक चालत्या रेल्वेतून पडला असल्याचे समजले असता त्यांनी रेल्वे पोलिसाना कल्पना दिली. रेल्वेचे सहाय्यक फौजदार शेख मुस्तफर व एल एन शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ट्रकमॅन जाधव व त्यांचे सहकारी यांनी रुग्णवाहीकेतून या रुग्णास ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलं.

या युवकाचे नाव बजरंग लिंबाजी डूकरे असे आहे. तो पिंपळदरी (ता-हिंगोली) येथील असल्याचे समजते. या युवकाजवळ अहमदनगर ते नांदेड रेल्वे तिकीट, आधारकार्ड, पॅनकार्ड सापडले आहे. या युवकास डोक्याला, हाताला-पायाला जबर मार लागलेला आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com