ज्यांच्या विरोधात तक्रार त्यांच्याच हातात कारभार

दूधगंगा पतसंस्थेतील अनाकलनीय कोडे
ज्यांच्या विरोधात तक्रार त्यांच्याच हातात कारभार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी (Financial Fraud Case) ज्या कर्मचार्‍यांवर आरोप (Accusation) करण्यात आले होते ते कर्मचारी आम्ही नाही त्यातले अशा अविर्भावात कामावर रुजू झाले आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षांनी या कर्मचार्‍यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार (Police Station Complaint) केलेली असताना हे कर्मचारी कामावर कसे असा सवाल ठेवीदार व सभासदांमधून विचारला जात आहे.

ज्यांच्या विरोधात तक्रार त्यांच्याच हातात कारभार
पिक विमा हप्त्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकर्‍यांची 4 लाखांची फसवणूक

आर्थिक अपहरणामुळे वादग्रस्त ठरलेली दूधगंगा पतसंस्था (Dudhganga Credit Union) बंद करण्यात आली होती. सहा दिवसांच्या टाळे बंदी नंतर सोमवारी ही पतसंस्था (Credit Union) पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे ठेवेदाराने गर्दी केली होती. सोमवारी सुमारे 17 लाख रुपये ठेवीदारांना देण्यात आल्याचे समजते. काल पतसंस्थेत फारशी गर्दी नव्हती पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व इतर कर्मचारी पतसंस्थेमध्ये ठाण मांडून बसलेले होते.

ज्यांच्या विरोधात तक्रार त्यांच्याच हातात कारभार
..अखेर निळवंडे धरणाच्या बोगद्याचे काम पुर्ण

दूधगंगा पतसंस्थेत व्यवस्थापक व इतर कर्मचार्‍यांनी अपहार केल्याची तक्रार पतसंस्थेच्या अध्यक्षांनी शहर पोलीस स्टेशन व उपनिबंधक कार्यालयात केली होती. कर्मचार्‍यांनी अपहर केला असेल तर त्यांना कामावर बोलवले कसे असा सवाल उपस्थित ठेवीदार विचारताना दिसत होते. या अपहारातील खरे सूत्रधार वेगळेच असल्याची चर्चा पतसंस्था परिसरात होत आहे. येणार्‍या काही दिवसात आर्थिक गडबडीमुळे संचालक मंडळ अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ज्यांच्या विरोधात तक्रार त्यांच्याच हातात कारभार
दूधगंगा पतसंस्था सोमवारपासून पुन्हा सुरु होणार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com