पोलिस सोबत असल्याची भावना जनतेच्या मनात रुजवावी - मंदार जवळे

पोलिस सोबत असल्याची भावना जनतेच्या  मनात  रुजवावी - मंदार जवळे

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतांना पोलिस आपल्यासोबत आहेत अशी भावना जनतेच्या मनात असली पाहिजे

असे प्रतिपादन शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी केले.

पोलिस उपअधीक्षक जवळे यांची शेवगाव विभागातुन बदली झाल्याने कुकाणा पोलिस दुरक्षेत्रात कर्मचारी वर्गाच्यावतीने सत्कार करुन निरोप देण्यात आला. त्यावेळी उपअधीक्षक जवळे यांनी कुकाणा पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. प्रारंभी कुकाणे दुरक्षेत्राच्या वतीने पोलिसांनी जवळे यांचा सत्कार करण्यात आला.

उपअधीक्षक जवळे पुढे म्हणाले, कुकाणा पोलिसांनी जनतेशी समन्वय ठेवल्याने दुरक्षेत्राचे उल्लेखनिय काम उभे राहिले. जनतेने विश्वास ठेवत लोकसहभागातुन दुरक्षेत्राचे रुप पालटले. जनतेचा विश्वास मिळवला हेच खरे काम आहे.

याप्रसंगी हेडकॉन्टेबल भीमराव पवार, किशोर काळे, जयवंत तोडमल, नितिन भताने, अंबादास गिते, अशोक कुदळे, अप्पासाहेब तांबे आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com