चित्रकला परीक्षा नाव नोंदणीस मुदतवाढ

चित्रकला परीक्षा नाव नोंदणीस मुदतवाढ

पारनेर |प्रतिनिधी| Parner

शासनाच्या चित्रकला परीक्षा 9 ते 12 एप्रिल रोजी होत आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 25 मार्च देण्यात आली होती. यात वाढ करून ती 31 मार्च करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने दहावीचे विद्यार्थी कला विषयातील वाढीव गुणांपासून वंचित राहू नयेत म्हणून 9 ते 12 एप्रिलला ऑफलाईन पद्धतीने शासकीय चित्रकला परीक्षा घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणीची अंतिम मुदत 25 मार्च देण्यात आली होती. परंतु राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने या फॉर्म भरण्याच्या कामाला अनेक अडचणी येत असल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी तातडीने कलासंचालनालयाशी पत्रव्यवहार केला. यावर कला संचालकांनी सकारात्मक निर्णय घेत संघटनेने सुचविल्याप्रमाणे ऑनलाईन विद्यार्थी व शाळा नोंदणीसाठी 31 मार्च अशी अंतीम मुदत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय पठाडे यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यात सुमारे 52 रेखाकला परीक्षा केंद्रे आहेत.

विशेष म्हणजे सर्व केंद्रांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण करण्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे. तसेच विद्यार्थ्यांची नोंदणीही 80 टक्के पूर्ण झाली आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष पठाडे यांनी सर्व केंद्रचालकांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप व झूम मिटींगच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी समन्वय साधून या कामाला गती दिली आहे.

Related Stories

No stories found.