
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत दुष्काळदृष्य स्थिती आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या विजेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहेत. टंचाईकाळात व प्रशासनाने जनतेची कामे करून जनतेला दिलासा द्यावा. शासकीय कर्मचार्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी अन्यथा तुमच्याविरुद्ध आम्हाला कठोर भुमिका घ्यावी लागेल प्रसंगी तुमच्या कार्यलयात आम्हाला येऊन बसवावे लागेल असा इशारा आमदार राजळे यांनी दिला.
पाथर्डी तालुका आमसभा व टंचाई आढावा बैठक आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरे मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसिलदार शाम वाडकर,कृषी उपविभागीय अधिकारी पोपट नवले, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, बांधकाम विभागाचे सहाय्यकअभियंता वसंत बडे, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, माणिक खेडकर, चारुदत्त वाघ, अजय भंडारी, सुभाष बर्डे, विष्णुपंत अकोलकर, धनंजय बडे , सुनिल ओव्हळ, काकासाहेब शिंदे, बंडू पठाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, विकास शिंदे,संजय बडे, नितीन गर्जे, रविंद्र आरोळे ,संजय मरकड, सचिन नेहुल, बाळासाहेब अकोलकर, अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, अजय भंडारी, पोपट बडे, नागनाथ गर्जे, महेश अंगारखे बाळासाहेब पाखरे उपस्थित होते.
यावेळी जल जीवन मिशन आणि वीज वितरण कंपनीच्या विरोधात बैठकीत सर्वाधिक तक्रारींचा पाढा लोकांनी वाचला. या बैठकीत तालुक्यात जलजीवन योजनेची 34 कामे चालू असून या सर्वच कामाविषयी नागरिकांनी मोठ्या तक्रारी केल्याने या विषयावर पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक आयोजित करू असे आश्वासन आ. राजळे यांनी दिले. या बैठकीत बोलताना आ. राजळे म्हणाल्या कि सध्या तालुक्यात तेरा टँकर सुरु असले तरीही भविष्यात आणखी वाढ होणार असल्याने अधिकार्यांनी या विषयावर तातडीने उपाययोजना अधिकार्यांनी कराव्यात. ज्या गावात टँकरची आवश्यकता आहे त्या गावच्या प्रतिनिधींनी तातडीने प्रस्ताव पाठवावेत. सर्वच विभागाच्या अधिकार्यांनी आजच्या बैठकीत ज्या तक्रारी नागरिकांनी केल्या त्याला येत्या आठ दिवसात उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे व तसा अहवाल आपल्याला सादर करावा असेही आदेश शेवटी राजळे यांनी दिले.
वायरमनला निलंबित करण्याचे आदेश
साकेगाव येथील पूर्वीचा वायरमन यांने शेतकर्यांचे वीज बिलाचे लाखो रुपये गोळा करून हडप केले.त्याचप्रमाणे लोकांची उद्धटपणाची वागणूक देऊन वीज वितरण कंपनीचे मालमत्ता असलेले वायर, तारा भंगारात विकण्याचा प्रकार केला अशा कर्मचार्याला निलंबित करा अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना दिल्या.