दारू पिऊन वाहन चालविणे भोवले

चौघांविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
दारू पिऊन वाहन चालविणे भोवले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असून दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. चौघांवर वेगवेगळ्या ठिकाणी कोतवाली पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये सोहेल शेख (वय 23, रा. काटवन खंडोबा रोड, नगर), विशाल गोंंधळे (वय 38, रा. ख्रिस्त गल्ली, नगर), शशिकपूर सिंग (वय 36, रा. डिपेंन्डर सेफ्टी शुज, एल 69, रेणुकामाता मंदिर जवळ, नागापूर), संदेश शशिकांत भिंगारदिवे (वय 28, रा. घास गल्ली, भिंगार) आदींचा समावेश आहे. 30 डिसेंबरला 8 ते 11 दरम्यान सहायक पोलीस विवेक पवार, हवालदार बापूसाहेब गोरे, दीपक कैतके, मुकुंद दुधाळ, श्रीकांत खताडे, याकूब सय्यद यांना इम्पिरियल चौकात नाकाबंदी दरम्यान रात्री अ‍ॅक्सेस स्कुटी (एमएच 16, सीएक्स 0428) या गाडीवरील चालक साहेल गुलाब शेख मद्य सेवन करून गाडी चालवत असल्याचा संशय आला.

त्यास थांबवले असता मद्य सेवनाचा वास आला. त्यानुसार रवींद्र टकले यांच्या फिर्यादीवरून सोहेल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अ‍ॅक्टीव्हा स्कुटी (एमएच 16 ऐके 25) या गाडीवरील चालक विशाल मुकेश गोंधळे मद्यसेवन करून गाडी चालविताना आढळला. याप्रकरणी गोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्युपिटर (युपी 80 एफएच 2536) गाडीवरील चालक शशिकपूर सिंग याने मद्यसेवन केलेले आढळले. त्यांच्यावर श्रीकांत खताडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. डिस्कव्हर मोटार सायकल (एमएच 17 एएल 1170) या गाडीवरील चालक संदेश शशिकांत भिंगारदिवे मद्य सेवन करून गाडी चालवत होता. दीपक कैतके यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com