धोका टाळण्यासाठी खबरदारी घ्या

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई कामाची पाहणी
धोका टाळण्यासाठी खबरदारी घ्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणार नाही, यासाठी नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील काही वर्षात नागरिकांना पावसाळ्यात ज्या अडचणींना तोंड द्यावे लागले, त्याचा विचार करुन ज्या ठिकाणी समस्या उद्भवतात, अशा ठिकाणी विशेष लक्ष द्या. पावसामुळे होणारा धोका टाळण्यासाठी खबरदारी घ्या, अशा सूचना महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापालिका अधिकार्‍यांना दिल्या.

महानगरपालिका हद्दीतील वारुळाचा मारुती येथे सुरु असलेल्या नाले सफाई कामाची पाहणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केली. याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, इंजि.आर.जी.सातपुते आदी उपस्थित होेते.

महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की, पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील नाले सफाई कामाची सुरुवात झाली आहे, तसेच नदी पात्रातील कचरा, घाण काढून नदीपात्र रुंद करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पावसाच्या पाण्याचा धोका राहणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घ्या.

याप्रसंगी इंजि.आर.जी.सातपुते म्हणाले, दरवर्षीप्रमाणे नालेसफाईचे कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील नालेसफाई जवळ-जवळ पूर्ण झाली असून, आता उर्वरित नदी पात्राजवळील सफाई व नदी पात्राचे रुंदीकरण्यात करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यात आली.

याप्रसंगी नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे यांनीही सूचना केल्या, ज्या भागात नेहमी पाणी साचते त्या ठिकाणीची माहिती देत उपाययोजना करण्याच्या सूचना मांडल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com