डॉ.विखे पाटील साहित्य पुरस्कार स्थगित
सार्वमत

डॉ.विखे पाटील साहित्य पुरस्कार स्थगित

पुरस्‍कार समारंभ कोवीड-१९ च्‍या पार्श्‍वभूमिवर स्‍थगित

Nilesh Jadhav

लोणी | वार्ताहर | Loni

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती दिनाच्‍या निमित्‍ताने दरवर्षी आयो‍जित करण्‍यात येणारा राज्‍य स्‍तरीय साहित्‍य जीवन गौरव आणि कला गौरव पुरस्‍कार समारंभ कोवीड-१९ च्‍या पार्श्‍वभूमिवर स्‍थगित करण्‍यात आला असल्‍याची माहीती पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ. रावसाहेब कसबे आणि कार्यक्रम संयोजन समितीचे समन्‍वयक व कारखान्‍याचे कार्यकारी सचांलक ठकाजी ढोणे पाटील यांनी दिली.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती दिनाच्‍या निमित्‍ताने दरवर्षी साहित्‍य पुरस्‍कारांचे वितरण साहित्‍य संमेलच्‍या अध्‍यक्षांच्‍या उपस्थितीत करण्‍यात येते. साहित्‍य क्षेत्रात प्रतिष्‍ठेच्‍या आणि मानाच्‍या समजल्‍या जाणा-या या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य पुरस्‍काराचे वितरण करण्‍याची परंपरा मागील २९ वर्षापासुन प्रवरा परिवाराने कायम ठेवली आहे. यंदा पद्मश्रींचा १२० वा. जयंती दि‍न ३ ऑगस्‍ट २०२० रोजी नारळी पौर्णिमेच्‍या दिवशी आहे. कोवीड-१९ च्‍या पार्श्‍वभूमिवर केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या निर्देशाप्रमाणे जाहीर कार्यक्रम आणि समारंभ आयोजित करण्‍यास निर्बंध असल्‍यामुळे यावर्षी जयंतीदिन समारंभ आणि साहित्‍य व कला गौरव पुरस्‍कार स्‍थगित करण्‍याचा निर्णय साहित्‍य पुरस्‍कार वितरण समिती आणि कार्यक्रम संयोजन समितीच्‍या वतीने प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे सांगण्‍यात आले.

यावर्षी जयंती दिनाच्‍या निमित्‍ताने कोणतेही जाहीर कार्यक्रम न करता प्रवरानगर येथील स्‍मृतीस्‍थळावर अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यावर्षीचे साहित्‍य व कला गौरव पुरस्‍कार एकत्रितपणे पुढील वर्षी देण्‍याचा निर्णयही पुरस्‍कार निवड समिती आणि कार्यक्रम संयोजन समितीने घेतला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com