‘डॉ. तनपुरे’ कामगारांचे आजपासून उपोषण सुरू

‘डॉ. तनपुरे’ कामगारांचे आजपासून उपोषण सुरू
डॉ. तनपुरे कारखाना

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

डॉ. तनपुरे कारखान्याच्या (Dr. Tanpur Sugar Factory) कामगारांची (Workers) सहनशीलता संपल्याने अखेर संपाचे हत्यार उपसले असून आता आरपारचा लढा पुकारला आहे. आज सोमवार दि.23 पासून कामगार आपल्या न्यायहक्कासाठी कारखाना कार्यस्थळावर उपोषणाला (Movement) बसणार आहेत.

कारखान्याच्या (Dr. Tanpur Sugar Factory) विद्यमान संचालक मंडळाच्या काळातील दि.1 ऑगस्ट 2017 ते 31 ऑगस्ट 2021 अखेर थकित वेतन (Paiding salary), वेतन आयोगाचा थकित फरक, भविष्य निर्वाह निधी (PF), उपदान निधी, रिटेंशन अलाऊन्सची थकबाकी यासाठी कामगारांनी उपोषण, आंदोलनाचा इशारा (Movement Hint) दिला आहे. कामगारांनी दहा दिवसांपूर्वी तहसीलदार फसियोद्दीन शेख, सहाय्यक कामगार आयुक्त, कारखाना व पोलीस प्रशासनाला आंदोलनाची नोटीस Movement Notice) दिली. उपोषणाला बसणार्‍या कामगारांनी राहुरी (Rahuri) येथे शनी मंदिरात थकित रकमा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर ठाम असल्याचे सांगितले.

सहाय्यक कामगार आयुक्त नगर, कारखाना व्यवस्थापन व कामगारांची बुधवार ता. 18 व पुन्हा शनिवारी बैठक झाली. परंतु, कोणताही तोडगा निघाला नाही. कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे (Namdev Dhokne) व संचालक मंडळाने कामगारांशी चर्चा करून आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोही फोल ठरला. कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, राजू सांगळे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे यांनी उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.

पेरणे म्हणाले, मागील पाच वर्षात कामगारांचे 25 कोटी 36 लाखांची थकबाकी आहे. थकबाकी दिली नाही तर आज सोमवारपासून (Monday) अन्नत्याग करून आमरण उपोषण, थाळीनाद, जागरण गोंधळ, घंटानाद, अर्धनग्न आंदोलन, रास्तारोको (Rasta Roko) अशी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची (Movement) तीव्रता वाढविली जाईल. आठ दिवसांनंतर सामूहिक आत्मदहन (Suicide) केले जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com