डॉ. तनपुरे कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करा

राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांची खा.डॉ. विखे यांच्याकडे मागणी
डॉ. तनपुरे कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करा

उंबरे |वार्ताहर| Umbare

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम (The crushing season of sugar factories in the district) आता अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपले आहेत. त्यासाठी अनेक कारखान्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. ऊसतोडणी कामगार (Sugarcane workers), यांत्रिक दुरूस्ती (Mechanical repair), उसाच्या नोंदी (Sugarcane logs), लेबर नियोजन (Labor planning), प्रशासकीय उपाययोजना (Administrative measures)आदी कामे युद्ध पातळीवर सुरू झाली आहेत. मात्र, राहुरी (Rahuri) तालुक्याची कामधेनू समजल्या जाणार्‍या डॉ.तनपुरे कारखान्याच्या (Dr. Tanpure Sugar Factory) अंगणात अद्यापही शुकशुकाट असल्याने शेतकरी व कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारखाना चालू होईल की नाही? असा सवाल शेतकरी सभासद विचारू लागले आहेत.

दरम्यान, जिल्हा बँकेचे (District Bank) माजी संचालक सुरेश करपे, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर, राहुरीचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, अनिल आढाव, भाजपाचे राहुरी (Rahuri BJP) तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, भाजपाचे माजी अध्यक्ष साहेबराव म्हसे, बबनराव कोळसे, सुरेश थेवरकर, बाबुराव ढोकणे, चंद्रकांत जाधव, आशिष बिडगर, युवराज गाडे, ज्ञानेश्वर भिंगारदे, अशोकराव उंडे, बापूसाहेब धसाळ, निवृत्ती आढाव यांनी डॉ.तनपुरे साखर कारखाना (Dr. Tanpure Sugar Factory) सुरू करण्याची मागणी कारखान्याचे मार्गदर्शक खा. डॉ. सुजय विखे यांच्याकडे केली आहे. खा. डॉ. विखे (MP. Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मागील वर्षी तांत्रिक कारणामुळे या कारखान्याचा गळीत हंगाम उशिराने सुरू झाला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचा ऊस गाळपाविना पडून राहून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदाही गाळप वेळेवर सुरू होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 12 लाख टन ऊस गाळपाच्या प्रतिक्षेत उभा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातही उसाचे प्रमाण वाढलेले असल्याने बारापैकी अगदी दोन ते तीन साखर कारखाने राहुरीच्या कार्यक्षेत्रात ऊस नेण्यासाठी ढवळाढवळ करणार नाहीत. त्यामुळे राहुरीच्या उसाला बाहेरील कारखान्यांकडून मागणी अगदीच कमी राहणार आहे. पर्यायाने डॉ. तनपुरे कारखाना सुरू झाला तरच शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप होणार आहे.

अन्यथा तालुक्यातील अनेक ठिकाणी गाळपाविना ऊस शिल्लक राहण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. मागील पावसाचे प्रमाण जादा असल्याने यंदा राहुरी तालुक्यात आडसाली उसाचे प्रमाण कमी असून खोडवा व सुरूचे प्रमाण जादा आहे. मागील वर्षी डॉ. तनपुरे कारखान्याकडे सुमारे 6 हजार हेक्टर उसाच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र, शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याने नोेंदीचे प्रमाण कमी असून आतापर्यंत कारखान्याकडे अवघ्या हजार हेक्टरच्या नोंदी झाल्या आहेत.

यंदा हा कारखाना सुरू होण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. यावर्षी कारखाना चालू झाला तरच तो पुढे चालू राहणार आहे. अन्यथा यंदा बंद राहिला तर कारखान्याचा गाडा आर्थिक आरिष्ट आणि तांत्रिक त्रुटीच्या चक्रव्युहात अडकून शेतकर्‍यांचे व पर्यायाने राहुरी तालक्याच्या बाजारपेठेसह कामगारांचे अतोनात नुकसान होणार आहे. कामगार आणि शेतकर्‍यांचे संसार पुन्हा उर्जितावस्थेत आणण्याबरोबरच तालुक्याच्या मरगळलेल्या बाजारपेठेला अर्थसंजीवनी देण्याचे कर्तव्य खा. डॉ.सुजय विखे (MP Sujay Vikhe Patil) यांना पार पाडावे लागणार आहे. यातच त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष शामराव निमसे व सर्व संचालक यांनी खा. डॉ. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सत्तासुत्रे सांभाळताना शेतकरी, कामगारांनाही न्याय मिळवून दिला. त्यामुळे आता पुन्हा या न्यायाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खा. डॉ. विखेे यांच्या ताब्यात कारखान्याची सत्तासुत्रे आल्यानंतर पहिल्या वर्षी काही तांत्रिक कारणामुळे कारखाना बंद राहिला. मात्र, दुसर्‍या वर्षी खा. डॉ. विखे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने कारखान्याची चाके सुसाट वेगाने धावली. सन 2017-18 यावर्षी 2 लाख 19 हजार 909 टन गाळप होऊन 2 लाख 25 हजार 675 क्विंटल पोते साखरेचे उत्पादन झाले. यावेळी साखर उतारा 11.51 होता. तर सन 2018-19 यावर्षी 3 लाख 36 हजार 115 टन गाळप होऊन 3 लाख 93 हजार 850 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. यावेळी सरासरी साखर उतारा 11.74 मिळाला. सन 2020-21 या वर्षात 2 लाख 33 हजार 255 टन गाळप होऊन 2 लाख 18 हजार 600 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. तर यावेळी साखर उतारा 9.37 होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com