डॉ. तनपुरे कारखाना बचाव कृति समितीचे चक्री उपोषण सुरू

डॉ. तनपुरे कारखाना बचाव कृति समितीचे चक्री उपोषण सुरू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

डॉ. तनपुरे कारखान्यातील कोट्यावधींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी काल बुधवार दि. 11 जानेवारी पासून कारखाना बचाव कृती समितीचे राहुरी तहसिल कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरु झाले असून या उपोषणाला तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी हजेरी लावून पाठिंबा दर्शविला.

यावेळी कृति समितीचे संयोजक अमृत धुमाळ म्हणाले, मागील सहा वर्षे कारखान्यात भंगार विक्री, साखर विक्री, इथेनॉल विक्री, कारखाना मालकीची जमीन विक्री, कारखाना मालकीच्या जमिनीतील गौण खनिज उत्खनन व विक्री, कारखाना संलग्न संस्थेतील शिक्षक भरती, डोनेशन अशा विविध प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता नसताना, साखर आयुक्तांची मान्यता नसताना प्रभारी कार्यकारी संचालकपदी बी. एन. सरोदे यांची नेमणूक करण्यात आली.

या सर्व गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी कारखाना बचाव कृति समितीचे हे चक्री उपोषण सुरू आहे. विरोधकांनी आमच्या चौकशीची मागणी केली आहे. चौकशीला आम्ही घाबरत नाही. दोषी आढळल्यास शिक्षा भोगण्यास तयार आहे. खुशाल आमची चौकशी करा. परंतु, तुमच्या गैरव्यवहाराची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.

युवा नेते राजूभाऊ शेटे म्हणाले, विद्यमान संचालक मंडळ आम्हाला कारखाना तुमच्या ताब्यात घेऊन चालवा, असे आवाहन करतात. मात्र, विद्यमान संचालक मंडळ कारखाना चालविण्यास असमर्थ असल्याने तसेच संचालक मंडळाची मुदत संपली असताना विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे देणे गरजेचे होते. त्यानंतर निवडणूका होऊन आम्ही निवडणूकीच्या माध्यमातून सभासदांच्या आशिर्वादाने कारखाना ताब्यात घेतला असता.

त्यानंतर नविन संचालक मंडळाने जिल्हा बँकेकडे मुदत वाढवून मागीतली असती. मात्र, विद्यमान संचालक मंडळाची निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारीच नव्हती. राहुरी तालुक्यातील ऊस त्यांच्या कारखान्याला नेण्यासाठी या वर्षी डॉ. तनपुरे कारखान्याचे गळीत हंगाम बंद ठेवण्याचे हे षडयंत्र होते. यावेळी अ‍ॅड. पंढरीनाथ पवार, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, दिलीप इंगळे, बाबुराव मकासरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कारखाना बचाव कृती समितीच्या चक्री उपोषणाला पाठिंब्यासाठी जि. प. चे माजी अध्यक्ष अरुण कडू, बाळासाहेब जठार, बाळासाहेब जाधव, विजय गव्हाणे, संजय पोटे, बाळासाहेब खपके, सुरेश गाडे, केशव आढाव, गणेश गोपाळे, जि.प. सदस्य धनराज गाडे, वैभव जरे, रामा शिंदे, नारायण जाधव, संदीप आढाव, अर्जुन पोटे, सूर्यकांत भुजाडी, विलास खपके, बापूसाहेब खपके, आप्पासाहेब गागरे, फंकीरा संसारे, भगवान गागरे, एकनाथ आडसुरे, अनिल पेरणे, राजेंद्र भिंगारदे, दादासाहेब पवार, अनिल गांगर्डे, मनोज खुळे, अमोल बेलेकर, संतोष धसाळ, सर्जेराव म्हसे, अरुण चव्हाण, नितीन कदम, मयूर मोरे, गणेश खुळे, बाळासाहेब वाघ, कृष्णकांत सूर्यवंशी, नदीम शेख, जगन्नाथ गाडे, सचिन पवार, विजय उंडे, किशोर भांड, प्रसाद गीते, रवी साळवे, अनिकेत गीते, गणेश पाटील, सुनील जोशी, संभाजी मोरे, दीपक ढोकणे, विलास गाडे, गणेश खिलारी, संदीप कदम, संदीप लगे, सचिन ढोकणे, सुनील काळे, आदिनाथ डांगे, भाऊसाहेब जाधव, नारायण टेकाळे, काशिनाथ जाधव, दादासाहेब पवार, भाऊसाहेब शिंदे आदींसह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com