डॉ. तनपुरे कारखान्याच्या सहा कामगारांना अटक व सुटका

डॉ. तनपुरे कारखान्याच्या सहा कामगारांना अटक व सुटका
डॉ. तनपुरे कारखाना

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना (Dr.Tanpure Sugar Factory) आंदोलकांनी (Agitator) प्रवरा कारखान्याच्या कामगाराला (Pravara Factory Workers) काळे फासल्याप्रकरणी राहुरी पोलिसात (Rahuri Police) गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास याप्रकरणी 6 कामगारांना राहुरी पोलिसांनी (Rahuri Police) अटक (Arrested) केली होती. व कोर्टात (Court) जामीनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना जामीन (Bail) देवून सुटका करण्यात आली.

अविनाश खर्डे नामक प्रवरा कारखान्याच्या (Pravara Factory) हिशोबनिसास तनपुरे कारखाना (Tanpure Factory) कामगारांनी काळे फासले होते. याप्रकरणी खर्डे यांच्या फिर्यादीवरून इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, सुरेश तनपुरे, नामदेव शिंदे यांच्यासह इतर कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आंदोलन सुरूच होते. आंदोलन मिटवण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले (Shivajirao Kardile) यांनी यशस्वी मध्यस्थी करून आंदोलकांना चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या सह्यानिशी दिलेल्या लेखी पत्रात कामगारांवरील गुन्हा मागे घेण्याचे नमुद करण्यात आले होते.

दरम्यान मंगळवारी पहाटे डॉ. तनपुरे कारखाना कामगारांना राहुरी पोलिसांनी अटक (Rahuri Police Workers Arrested) केल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळी हा प्रकार कामगार बांधवांना समजताच डॉ.तनपुरे कारखाना प्रवेशद्वारावर कामगारांनी एकत्रित येऊन संताप व्यक्त केला. त्यानंतर जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केेले. नंतर कामगारांची सुटका करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com