डॉ.तनपुरे कारखाना पगारप्रश्नी राहुरी फॅक्टरी येथे रास्तारोको

डॉ.तनपुरे कारखाना पगारप्रश्नी राहुरी फॅक्टरी येथे रास्तारोको

राहुरी फॅक्टरी | वार्ताहर

डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या (Dr. Baburao Bapuji Tanpure Co-operative Sugar Factory) कामगारांचे सध्या जिल्ह्यामध्ये उपोषण (Employees Strike) गाजत आहे. कारखान्याच्या कामगारांनी गेल्या अनेक वर्षापासून थकीत पगार (Tired salary), ग्रॅज्युईटी फंड (Graduation Fund) यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथे शिवाजी पुतळ्यासमोर उपोषण सुरु केले आहे.

या उपोषणाला अनेक संघटनांनी, लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान कारखाना कामगारांच्या पगारप्रश्नी आरपीआय (RPI), शिवसेना (Shivsena), कामगार बांधव व अन्य सामाजीक संघटनांनी राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावर (Nagar-Manmad Highway) रास्ता रोको (Rasta Roko Andolan) केला. सुमारे एक तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा रहदारी ठप्प झाली होती.

डॉ तनपुरे कारखाना कामगार आंदोलनाबाबत आज संध्याकाळी पर्यंत तोडगा काढण्याचा शब्द खा.सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांनी दिला आहे, आपण उद्या पर्यंत वाट पाहु मात्र तोडगा निघाला नाही तर यानंतरचा मोर्चा खा. सुजय विखे यांचे घरावर नेऊ असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे (Raosaheb Khevre), आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात (Surendra Thorat) यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com