राहुरी फॅक्टरीवर कामगारांसाठी शिवसेना व रिपाइंचा रास्तारोको

राहुरी फॅक्टरीवर कामगारांसाठी शिवसेना व रिपाइंचा रास्तारोको

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

डॉ.तनपुरे कारखाना (Dr. Tanpure Factory) कार्यस्थळावर गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा (Support the worker movement) देण्यासाठी शिवसेना (Shivsena) व रिपाइंच्या (Repai) वतीने राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथे नगर-मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे (Shivsena) उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (Ravsaheb Khevare) यांनी हजेरी लावून कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले. तर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात (Ripai District President Surendra Thorat) व राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनीही कामगारांना न्याय देण्याची मागणी करीत आंदोलन (Movement) तीव्र करण्याचा इशारा (Hint) दिला आहे.

डॉ.तनपुरे साखर कारखाना (Dr. Tanpure Factory) थकीत देणी देणेबाबत चेअरमन नामदेवराव ढोकणे व संचालक मंडळ यांनी कामगार आंदोलकांसमोर लेखी प्रस्ताव ठेवून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु कामगारांनी प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर कामगारांच्या समर्थनार्थ आरपीआय (RPI) व शिवसेना (Shivsena) यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. दोन दिवसात कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी जाग आली नाही तर लोणी (Loni) येथे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख खेवरे यांनी दिला आहे. गेल्या सात दिवसांपासून डॉ.तनपुरे कारखाना (Dr. Tanpure Factory) थकीत पगारप्रश्नी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन मागे घेण्यासाठी खा.डॉ.सुजय विखे (MP Dr. Sujay VIkhe), माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile), संचालक मंडळ व भाजपचे (BJP) पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. मात्र, सकारात्मक चर्चा न झाल्याने कामगार आंदोलनावर ठाम राहिले.

काल सोमवारी सकाळी कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे व संचालक लेखी प्रस्ताव घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले. मात्र, कामगारांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. दरम्यान जिल्हाप्रमुख खेवरे यांनी आंदोलकांना भेट देऊन लेखी प्रस्तावावर चर्चा करीत असताना भ्रमणभाषवरून खा.विखेंशी संपर्क साधला. आपण जो प्रस्ताव ठेवला आहे. त्या प्रस्तावात देणी देणेबाबत ठोस कालावधी नमूद केलेला नाही. कामगारांचे तीन पगार व दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत 1 कोटी रुपये भरणा करण्याचे मान्य केलेले आहे. त्याप्रमाणे लेखी प्रस्तावात सुधारणा करून चेअरमन, कार्यकारी संचालक व आपल्या सहीने प्रस्ताव घेऊन या कामगारांना आंदोलन मागे घेण्यास लावतो, असे खेवरे यांनी खा.विखेंशी (MP Sujay Vikhe) संवाद साधताना सांगितले.

सुमारे तासभर नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले, तालुक्यातील राजकारण्यांमध्ये कारखाना चालू करण्याची दानत नाही. परंतु हे सर्व राजकारणी एकत्रित येऊन राहुरीची कामधेनू विकण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहेत. तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांला डोनेशनसाठी अडवणूक केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा थोरात यांनी दिला. तालुकाध्यक्ष विलास साळवे म्हणाले, खा.विखे व राज्यमंत्री तनपुरे एकत्र बसले तर डॉ.तनपुरे कारखाना (Dr. Tanpure Factory) कामगारांचा प्रश्न तातडीने सुटेल. परंतु राजकीय विरोध असल्याने दोन्ही नेते एकत्र येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. असे साळवे म्हणाले. आंदोलनात शिवसैनिक व भीमसैनिक सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com