डॉ. पोखरणा, डॉ. ढाकणे यांना अटकपूर्व जामीन

डॉ. पोखरणा, डॉ. ढाकणे यांना अटकपूर्व जामीन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नीतांडवप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबर रोजी आग लागली. या घटनेत आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा आणि डॉ. ढाकणे यांनी अर्ज दाखल केला होता. डॉ. पोखरणा यांनी करोनाच्या लाटेच्या वेळेस जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने या कक्षाची उभारणी केल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कक्षाचे बांधकाम झालेले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांचा प्रत्यक्ष या बांधकामाशी संबंध नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असा युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला. आग प्रतिबंधक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची नाही, असा त्यांचा दावा आहे. डॉ. सुरेश ढाकणे यांच्यावतीने दुर्घटनेवेळी ते गावी असल्याने प्रत्यक्ष आगीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दोघांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची सोलन्सी, न्यायालयाच्या परवानगीशिवाय जिल्हा सोडून न जाणे, तपासी अधिकारी बोलवतील त्यावेळेस हजर राहणे, साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे, पुराव्याशी छेडछाड न करणे आदी अटी घातल्या आहेत.

Related Stories

No stories found.