डॉ. पोखरणांच्या जामिनावर उद्या सुनावणी

जिल्हा रुग्णालय आग्नितांडव: डॉ. ढाकणेंचाही अर्ज
डॉ. पोखरणांच्या जामिनावर उद्या सुनावणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी दाखल गुन्ह्यात निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता गुरूवार, 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान शिवसेनेचे उपशहर प्रमुख गिरीश जाधव यांच्या हस्तक्षेप अर्जावर याच वेळी निर्णय दिला जाणार आहे.

डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. या जामीन अर्जामध्ये शिवसेनेचे शहर उपप्रमुख जाधव यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जात आपल्याला म्हणणे सादर करण्यास परवानगी द्यावी, असे जाधव यांच्यावतीने अ‍ॅड. अभिजित पुप्पाल यांनी म्हणणे सादर केले. डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन कायम करण्याच्या मुद्यावर म्हणणे सादर करण्यास तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सात दिवसांची मुदतवाढ मागितली.

वीज महावितरण कंपनीकडून जिल्हा रुग्णालयातील वीज जोडणी, अहवालाबाबत कोणतेही म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे सात दिवसांची मुदत मागितली. न्यायालयाने सात दिवसांची मुदत देण्यास नकार दिला. दोन दिवसांत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील डॉ. सुरेश ढाकणे यांनीही अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरही आता 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com