डॉ. पोखरणांच्या जामिनावर आज सुनावणी

डॉ. पोखरणांच्या जामिनावर आज सुनावणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी राज्याच्या मुख्य विद्युत विभागाने पोलिसांना अहवाल दिला नसल्याने निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज, शुक्रवार सुनावणी होणार आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉ. ढाकणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तसेच गिरीश जाधव यांच्या हस्तक्षेप अर्जावरही याचवेळी निर्णय दिला जाणार आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर गुरूवारी डॉ. पोखरणा, डॉ. ढाकणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. डॉ. पोखरणा यांच्या अर्जावर तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे म्हणणे मागविले आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी विद्युत निरीक्षकांकडील अहवाल येणे बाकी आहे. चार वेळेस नोटिसा देऊनही त्यांनी अहवाल सादर केला नसल्याने डॉ. पोखरणा यांच्या जामीन अर्जावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. डॉ. ढाकणे यांचे वकील सुनावणीच्या वेळेस अनुपस्थित होते. त्यामुळे ही सुनावणीही आज होणार आहे. शिवसेनेचे जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. निर्णयही आज दिला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com