
करंजी |प्रतिनिधी| Karanji
पुढील सात दिवस अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असून शेतकर्यांनी काढणी चालू असलेली तसेच नव्याने लागवड केलेल्या पिकांची काळजी घ्यावी असे प्रतिपादन हवामान तज्ञ डॉ. पंजाबराव डख यांनी येथे केले.
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे डॉक्टर बबनराव नरसाळे डॉक्टर नंदकिशोर नरसाळे यांनी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून हवामान तज्ञ डॉक्टर पंजाबराव डख व पशु आहार तज्ञ डॉक्टर अनिल शर्मा यांना आमंत्रित केले होते. यावेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना डख यांनी शेतकर्यांना पावसाळा आणि दुष्काळ कसा ओळखावा या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने दिली.
पशुआहार तज्ञ डॉक्टर शर्मा म्हणाले, कोरोना काळामध्ये माणसाची ह्युम्युनिटी पावर तपासली जायची त्याच पद्धतीने लंपी आजारातही जनावरांची ह्युम्युनिटी पावर महत्त्वाची असून पशुधनाला आहारात सुकाचारा असावा पिण्यासाठी स्वच्छ पाणी असावे. दुधाला नक्कीच चांगले दिवस येणार असून दूध धंदा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास डॉक्टर शर्मा यांनी व्यक्त केला.
यावेळी गंगाधर महाराज गाडेकर, वच्छलाताई महाराज साबळे, माजी सरपंच संतोष शिंदे, साहेबराव गवळी, चेअरमन चारुदत्त वाघ, पोपटराव गवळी, शिवसेनानेते भागिनाथ गवळी, चेअरमन मिठू मुळे, माजी सरपंच साहेबराव गवळी, संजय नवल, नामदेवराव दारकूंडे, शिवाजी वेताळ मेजर, युवानेते राजेंद्र दगडखैर, सरपंच भीमराज शेलार, पोपटराव घोरपडे, अर्जुन घोरपडे, बलभीम ससे, सिताराम गाडेकर, किरण ससे, दिलीप घोरपडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.