अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर सहकारी बँकेच्या कर्ज घोटाळ्यात फरार असलेल्या डॉ. नीलेश शेळके याला नगर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात डॉ. नीलेश शेळके याच्याकडे सुरूवातीला चौकशी होणार आहे, अशी माहिती उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे रेखा जरे हत्याकांडाचा तपास आहे. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा शोध सुरू आहे. बोठे हा पुणे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पथक त्याचा माग काढताना डॉ. शेळके आढळला. डॉ.शेळके हा आर्थिक गुन्ह्यात फरार असल्याची पथकाने खात्री करून घेतली आणि त्याला ताब्यात घेतले.