बाहुबली म्हणून मिरवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री खरे कटप्पा - डॉ. गोर्‍हे

डॉ. नीलम गोर्‍हे
डॉ. नीलम गोर्‍हे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

डान्सबारला बंदी असतानाही मुंबईत डान्स बार सुरू असून त्यावर येणार्‍या अधिवेशनात आणखी कडक धोरण आखण्यासाठी प्रयत्न करणार, असे सांगत स्वतःला बाहुबली म्हणून मिरवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री खरे कटप्पा असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी शिर्डीत केली.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे मंगळवारी रात्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. यावेळी गोर्‍हे यांनी शिर्डीतील पत्रकारांशी संवाद साधला. डॉ.गोर्‍हे म्हणाल्या, कर्नाटकचे मुख्यमंत्री जनतेचा विश्वसघात करत आहेत. काही संघटनांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बंदी आणत असतील तर ही लोकशाही योग्य नाही. याची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल, असा विश्वासही डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला. लवकरच हिवाळी आधिवेशन सुरू होत आहेत. या आधिवेशनात अनेक सभासद प्रश्न विचारत असतात काही प्रश्न जे अनिर्णित राहतात किंवा आहेत. त्यावर मी लवकरच बैठक घेणार आहे.

डान्सबार बंदी असूनही मुबंईत डान्सबार सुरू असतील तर त्यांना कोणाचे ना कोणाचा वरदहस्त असणार. यासंदर्भातील माहिती मला जर समजली तर मी स्वतः दखल घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कोणताही राजकीय नेता डान्सबारच्या बाजूने नाही. कारण सर्वपक्षीयांनी डान्स बार बंदीबाबत विधेयक एकमताने मंजूर केले असून यासाठी कायदाही लागू केला. काही बंधनेदेखील घालण्यात आली आहेत.

डान्सबारच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडतात आणि अल्पवयीन मुलींचा व्यापार देखील होतो. यामुळे अशा मुद्यांवर मी स्वतः सामाजिक प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार असून येणार्‍या अधिवेशनात आणखी कडक धोरण आखता येईल का हाही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोर्‍हे म्हणाल्या.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गसाठी खूप लक्ष घातले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः समृध्दी महामार्गाची पाहणी केली. या महामार्गाच्या बजेटसाठी बैठका देखील घेतल्या होत्या. करोना काळात या महामार्गाचे काम सुरू राहावे यासाठी प्रयत्न केले. केवळ श्रेय घेण्यासाठी महार्गाच्या शुभारंभसाठी ठाकरे कुटुंबातील कोणालाही बोलावले नाही, अशी टीकाही डॉ. गोर्‍हे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com