भाजपकडून षडयंत्र बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न

डॉ. नीलमताई गोर्‍हे यांचा आरोप
भाजपकडून षडयंत्र बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळ्या विषयावर षडयंत्र रचून लोकांमध्ये बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्‍हे यांनी केला.

लोकपंचायत संस्थेच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्या संगमनेर येथे आल्या होत्या. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या काहीवेळ संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात थांबल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. भाजपकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे. राजकारण गढूळ करण्याचे काम भाजपने केले. मुंबई महानगर पालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी वेगवेगळे प्रयोग त्यांचे सुरू आहे.

मात्र या प्रयत्नांना यश येणार नाही. राज्यातील आघाडी सरकार कामाची शिकस्त करत आहे. या सरकारबद्दल जनतेमध्ये नाराजी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वास आहे. मी पुन्हा येईल असे म्हणणार्‍यांचा अपेक्षाभंग झाल्याने त्यांचा तोल ढासळला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. त्यांनी भ्रष्टाचाराचे 300, 400 प्रकरणे काढली मात्र त्याचे पुढे काय झाले हे समजत नाही. घोटाळा सम्राट असे त्यांचे नाव ठेवले पाहिजे, असे डॉ. गोर्‍हे यांनी यावेळी सांगितले. वीज प्रश्नाबद्दल विचारले असता भारनियमन करू नये, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. गोर्‍हे यांनी शासकीय विश्रामगृहात करोनाने मृत्यू झालेल्या एकल महिलांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, करोना एकल समितीचे हेरंब कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे व तालुका संरक्षण अधिकारी उपस्थित होते.

ज्यांचे पती शेतकरी होते. पण करोनाने मृत्यू झाला आहे. अशा महिलांना कृषी विभागाने शेतीसाठी खते व बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत. महिलांच्या नावावर मालमत्ता व शेती हस्तांतरण लवकरात लवकर उपलब्ध व्हावे. यासाठी महसूल प्रशासनाने अशा महिलांना न्यायिक सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश ही श्रीमती गोर्‍हे यांनी यावेळी दिले.

एकल महिलांनी फक्त उद्योगासाठी कर्ज मिळविणे या एकच उद्देश न ठेवता शिक्षणानुसार नोकरी प्राप्त करण्यावर भर द्यावा. जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक ि्वकास महामंडळ व किमान कौशल्य विभागाच्या योजनांच्या माध्यमातून या महिलांना लाभ देणे शक्य आहे, असेही श्रीमती गोर्‍हे यांनी यावेळी नमूद केले.

Related Stories

No stories found.