कोतुळ |वार्ताहर| Kotul

अगस्ती कारखाना ही तालुक्याची भाग्यलक्ष्मी व आर्थिक संस्था आहे. याठिकाणी आर्थिक शिस्त पाहिजे.

शेतकर्यांची चूल कारखान्यावर आहे म्हणून कारखाना मोडित निघू नये तो निकोप सुरू राहावा अशी आमची भूमिका राहील, असे प्रतिपादन किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी केले.

आगामी अगस्ती कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पुणे बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी. जे .देशमुख यांच्या संकल्पनेतून शेतकरी उत्पादक मार्केटिंग व प्रक्रिया कंपन्या तालुक्यात सुरू करणे यासंदर्भात मुळा परिसरातील शेतकर्यांची बैठक कोतूळ येथे आयोजित केली होती. यावेळी डॉ. नवले बोलत होते . बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब बाबुराव देशमुख होते.

याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष रामनाथ शिंदे ,जिल्हा परिषद सदस्य रमेशराव देशमुख, धोंडिभाऊ आरोटे, रामदास देशमुख बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब देशमुख ,भाऊसाहेब पवार, शिवाजी देशमुख, सुनील शहा , शरद साबळे, हुसेन सय्यद,, सेवानिवृत्त पोलीस अधीकारी सयाजी देशमुख, दिनकर पवळे,आझाद सय्यद, निवृत्ती लोखंडे,भीमराज देशमुख , एकनाथ साबळे आदींसह परिसरातील गावांतील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. अजित नवले म्हणाले की, या पुढील काळ पारंपरिक शेती नाही तर आता नव्या वार्याची चाहूल घेऊन शेती करण्याचा काळ आहे.यासाठी शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून पुढे जाता येईल,असे त्यांनी सांगितले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी आम्ही कुणीतरी आहोत या अविर्भावात राहू नये अकोले तालुक्यातील 40 वर्षांची सत्ता आमच्या भाषणाने नाही तर जनतेच्या ताकदीने मोडून काढली. आता अगस्तीसाठी सर्व शेतकर्यांनी पुढे यावे व चांगली माणसे पाठवावीत, असे आवाहन केले.

बी. जे. देशमुख म्हणाले की -राज्यात प्रशासनात काम करताना साखर कारखान्यांच्या कामकाजाचा अनुभव घेतला. त्यामुळे अगस्ती कारखान्याला आर्थिक शिस्त लागली तर शेतकर्यांना टना मागे 200 ते 250 रुपये अधिक भाव देता येईल. आज इतर कारखान्या ंपेक्षा कमी भाव घेऊन शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

शेतकर्यांच्या मालकीच्या उत्पादक व प्रक्रिया मार्केटिंग कंपन्या तालुक्यात सुरू करून आपल्या ज्ञान व अनुभवाचा उपयोग तालुक्याला व्हावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचे बी. जे. देशमुख म्हणाले.

यावेळी कॉ. सदाशिव साबळे,दादा पाटील वाकचौरे, सुभाष नवले, भाऊसाहेब देशमुख, ब्राम्हणवाडा गावचे सरपंच भारत आरोटे, वाघापूरचे मारुती लांडे, आंभोळचे उत्तम साबळे, सुदाम डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त केले

रवींद्र आरोटे यांनी सूत्र संचालन केले तर अरविंद देशमुख यांनी आभार मानले.