
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
मराठवाडयाचे प्रवेशव्दार असलेल्या या तालुक्यात चांगले तर केल नाही मात्र होते त्याची वाट लावून टाकली. काही लोकप्रतिनिधी विमानतळाच्या गप्पा मारु लागले. शिर्डीला तर विमानतळ झाले. इकडं बसस्थानक नाही. खासदार अधिवेषनाला सकाळी दिल्लीला जात आणि संध्याकाळी घरी येतात. मात्र येथील नागरीकांना एसटीपासून वंचित ठेवण्याचे काम सुरु आहे. कोणी खासदार व्हा, कोणी आमदार व्हा आणि पाच दहा वर्ष जनतेला पिळवून काढा. अशी अवस्था सध्या या तालुक्याची झाली आहे. असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी केले.
शेवगाव येथील शुभम मंगल कार्यालयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक नियोजनसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घुले बोलत होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, रामनाथ राजपुरे, एजाज काझी, मन्सुर फारोकी, बबन भुसारी, नंदकुमार मुंढे, ताहेर पटेल आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी घुले म्हणाले, आपल्या तालुक्याचा विकास करायचा असले तर आपला लोकप्रतिनिधी का होवू शकत नाही. यासाठी सर्वांनी कंबर कसावी. कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, दुधसंघ, जिनींग प्रेसींग या संस्थासंह सर्व छोटयामोठया निवडणुंकासाठी आपण एकजुटीने काम करु. सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली जाईल. कोणीही बेईमानी करण्याचे काम करु नये.
यावेळी , ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे कैलास नेमाने, अनिल मडके, पंडितराव भोसले, बापूसाहेब गवळी, मन्सूर भाई फारोकी, शरद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष नंदुभाऊ मुंढे, मदनराव मोटकर, रामनाथ राजापुरे, भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी युवकचे जिल्हाकार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले. तर प्रसाद पवार यांनी आभार मानले.