पाणीपुरवठ्याच्या तळ्याची बीमसह खचलेल्या पिचिंगच्या कामाची चौकशी करून कारवाई करा - डॉ. धनवटे

पाणीपुरवठ्याच्या तळ्याची बीमसह खचलेल्या
पिचिंगच्या कामाची चौकशी करून कारवाई करा - डॉ. धनवटे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा गावासाठी जलस्वराज टप्पा क्र.2 च्या पाणी योजनेचे काम सुरु आहे तळ्याचे संपूर्ण काम झाले होते; परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे तळ्याची दक्षिण व पश्चिम बाजूची दगडाची व मातीची वॉटरप्रुफ कागदावरील पिंचिग खाली खचली असून तळात दिलेले बीम देखील निसटले आहे. यातील दोषी अधिकारी ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करावी. जोपर्यंत योग्य डिझाईन देऊन पिचिंग खाली येणार नाही. लेखी हमी देत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही व या कामाची मंत्रीस्तरावर विभाग निहाय चौकशी करावी, अशी मागणी पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष व सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी केली आहे.

पुणतांबा जल स्वराज्य टप्पा क्र.2 चे काम चालू आहे मागील वर्षापासून तलावाचे काम सुरू झाले पण करोनाने काम ठप्प झाले. ऐन पावसाळ्यात तळ्याच काम सुरू झाले. कागद व काळ्या मातीचा थर त्यावर दगड पिंचीगचा थर व बीम अतीवृष्टी झाल्यामुळे खाली खचले. मागील वर्षी दगडाची पिंचीग वरून खाली खचून वॉटरप्रुफ कागद खराब झाला होता. याबाबत पाणी पुरवठा कमिटीने आधिकार्‍यांना वारंवार सांगून लक्ष दिले नाही.

अधिकार्‍यांनी मनमानी करून याहीवेळेस तळात बीम टाकून दगड मातीचे पिंचिग वॉटरप्रूफ कागदावर केले; परंतू दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे तळाच्या बीमसह दगड माती पिंचिग मोठ्या प्रमाणात खाली खचली. मागील वर्षी ही बाब अधिकार्‍यांच्या अंगलट आल्या आहे. त्यामुळे संबंधीत अधिकार्‍यांनी बदली करून घेतली, असा आरोप सरपंच डॉ. धनवटे यांनी केला.

यावर्षी पुन्हा दुसरे अधिकारी आले परत सर्व दगड काढून काम सुरू केले. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांची अभियांत्रीकीची प्रमुख संस्था सीडीओ मेरि नाशिक यांनी डिझाईन केल्याप्रमाणे काम चालू झाले. खालच्या बाजूला अडीच फुटाचा बीम देण्यात आला. सर्व काम पूर्ण झाले. पाणीपुरवठा कमिटी व अधिकारी यांच्यात बैठक होऊन तळ्यात पाणी घेण्याचे ठरले; परंतु दोन दिवसापूर्वी 3 इंच पाऊस झाला आणि वॉटरप्रुफ कागदावरचा दगड व मातीची पिचिंग खाली खचली. शिवाय दक्षिण व पश्चिमेच्या बाजूचे बीमसह खाली खचले म्हणून सरपंच, उपसरपंच, पाणी कमिटी सदस्य यांची तातडीची बैठक घेवून अधिकारी यांना बोलावून घेतले.

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक लेखा परिक्षण समिती अध्यक्ष मुरलीधर थोरात यांच्यासह स्थळ पहाणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता क्षिरसागर, उपअभियंता विवेक रोटे हे उपस्थित होते. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झाले; परंतु काम करण्याचे आदेश दिले परंतू झालेले कामाची चौकशी करावी कारण दिलेला प्लॉन योग्य नव्हता का? यात कोण दोषी आहे का? त्यानुसार अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करून जोपर्यंत योग्य डिझाईन देऊन पिचिंग खाली येणार नाही, अशी लेखी हमी जीवन प्राधिकरणाचे आधिकारी देत नाही, तोपर्यंत काम करू देणार नाही. या कामाची मंत्रीस्तरावर विभाग निहाय चौकशी करावी अशी मागणी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी केली आहे.

शेततळ्याच्या कामाचे प्रश्न निर्माण झाले असेल तरी इतर कामे करून पाणी योजनेचे काम त्वरीत मार्गी लावावे त्यामुळे आगामी काळात पाणी पुरवठा नविन योजनेतून करण्याचे नियोजन असल्याचे पाणी पुरवठा कमिटी अध्यक्ष व सरपंच डॉ. धनवटे यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com