डॉ. आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा

न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने
डॉ. आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील मार्केटयार्ड समोरील हॉटेल सुखसागर व महापलिकेचा अनेक वर्षांपासून जागेवरून औरंगाबाद उच्च न्यायालयात वाद सुरू होता. याठिकाणी सध्या हॉटेल सुखसागर आणि त्या शेजारील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा अशी परिस्थिती होती. मात्र याठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारून बाकीच्या जागेत बगीचा आणि सुशोभीकरण करावे, अशी अनेक वर्षापासून आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे महानगरपालिका त्याठिकाणी काहीच करू शकत नसल्याने अखेर औरंगाबाद हायकोर्टात या प्रकरणाचा निकाल लागला असून हा निकाल महानगरपालिकेच्या बाजुने लागला आहे.

गेल्या 25 वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या जागेसाठी लढा देत होते. अनेक वेळा महानगरपालिकेत पुर्णाकृती पुतळा बसवण्याचा ठराव मंजूर झाला होता. अनेक महापौरांनी यासाठी प्रयत्नही केले होते. शहराचे आमदार संग्राम जगताप तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेऊन हा पुतळा मार्केटयार्ड समोरील जागेतच बसवण्याची ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून औरंगाबाद उच्च न्यायालय अ‍ॅड. होन आणि महानगरपालिकेचे अ‍ॅड. लोखंडे यांनी बाजू लावून धरली होती.

त्यामुळे तीन महिन्यांतच या प्रकरणाचा निकाल लागला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे भरवून फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी आ.जगताप, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, परिमल निकम, सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, निलेश बांगरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com