डॉ.आंबेडकर जयंती पुणतांबा ग्रामपंचायतीत उत्साहात

डॉ.आंबेडकर जयंती पुणतांबा ग्रामपंचायतीत उत्साहात

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा पोलीस चौकी व ग्रामपंचायत कार्यालयात राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन उत्साहाने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत धनवटे गुरुजी होते. सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर दीप प्रज्वलन करून उत्तम भोसले यांनी बुद्धवंदना घेतली.

या कार्यक्रमाप्रसंगी बाबासाहेब जाधव व काही मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनपट विषद केला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे, छगन जोगदंड, चांगदेव धनवटे यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय धनवटे, सदाशिव वहाटोळे, सोसायटीचे नूतन चेअरमन सुधाकर जाधव, व्हाईस चेअरमन अशोक धनवटे, छगन जोगदंड, विकास जोगदंड, अरुण थोरात,नितीन जोगदंड,गौतम थोरात प्रकाश लोंढे, संध्या थोरात, कचेश्वर आव्हाड, संतोष थोरात,फकीरा थोरात, चंद्रकांत वाटेकर गणेश बनकर किसन बोरबने,मनोज गुजराथी, गणपतराव वाघ, चांगदेव धनवटे, अमोल सराळकर, नवगिरे, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक गौतम थोरात यांनी केले तर प्रकाश लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com