डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत वाद

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत वाद

शिवसेना शहर प्रमुख सातपुतेंसह 13 जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरात शनिवारी (दि. 15) रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत चांगलाच राडा झाला. एकमेकांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून शिवसेना (शिंदेे गट) शहर प्रमुख दिलीप सातपुते, त्यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्यासह 13 जणांविरूध्द मारहाण, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल सुनील उमाप (वय 26 रा. एकनाथनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना शहरप्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते, ओंमकार दिलीप सातपुते, ऋषभ शिंदे, विशाल शिरवाळे, अरूण घुगे, अनिकेत शिर्के व आकाश पवार (सर्व रा. भूषणनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमाप यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान वरील सात जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या भाऊसाहेब कराळे व इतरांनाही मारहाण करण्यात आली. दुसर्‍या गटाचे विशाल मच्छिंद्र शिरवाळे (वय 23 रा. काटवन खंडोबा, महात्मा फुले वसाहत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश परदेशी, ओमकार कराळे, भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, मदणे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. केडगाव) यांच्याविरूध्द मारहाण, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत असताना मनोज कराळे व ऋषिकेश परदेशी यांनी दिलीप सातपुते कुठे गेला आहे, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केले. तसेच इतरांनी लाकडी दांडके घेऊन येत मारहाण करून जखमी केले’. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com