साफसफाई कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ

साफसफाई कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी) -

सफाई कामगारांच्या मुलांना दिल्या जाणार्‍या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला

आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता दुप्पट शिष्यवृत्ती मिळणार आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभात काही भरीव बदल करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रतिमहिना 110 रुपये शिष्यवृत्ती मिळत असे ती वाढवून आता प्रतिमहिना 225 रुपये करण्यात आली आहे. तिसरी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महिना 110 रुपये मिळत होते. आता ही रक्कम वाढवून 225 रुपये करण्यात आली आहे. तर वर्षाला मिळणारे एकत्रित मानधन हे पूर्वीप्रमाणे रुपये 750 इतकेच असणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षाला 1860 रुपये मिळत, नवीन नियमानुसार झालेल्या वाढीनंतर वर्षाला एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.

वसतिगृहात राहणार्‍या इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 700 रुपये व वार्षिक अनुदान 1000 रुपये या पूर्ववत नियमाप्रमाणेच सुरू राहील असेही या शासनानिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सफाईच्या क्षेत्रात व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणार्‍या हजारो कामगारांच्या पाल्यांना या निर्णयामुळे दामदुप्पट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जात/धर्म याचे बंधन असणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

इयत्ता 1ली किंवा त्यापुढील कोणत्याही इयत्तेत किंवा प्रीमॅट्रीक स्तरावर प्रवेशीत विद्यार्थ्यांना देय राहिल. हा लाभ इयत्ता 10वी पर्यंत मिळणार आहे. एका शक्षणिक वषात्तय दहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी पात्र असतील. या योजनेसाठी सर्व जाती धर्माचे विद्यार्थी पात्र असतील.

यांना मिळणार लाभ

या व्यवसायात काम करणार्‍या पालकांची मुले/मुली या योजनेसाठी पात्र असतील

हाताने मेहतर काम करणार्‍या/मानवी विष्ठांचे वहन करणार्‍या व्यक्ती कविा बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणार्‍या व्यक्ती.

अस्वच्छ व्यवसायाशी संबंध परंपरेने असलेले सफाईगार.

कातडी कमावणारे, कातडी सोलणारे.

कचरा गोळा करणे/उचलणे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com