गाढवाला दूध पाजून केले आंदोलन

गाढवाला दूध पाजून केले आंदोलन

दूध उत्पादकांचा एल्गार, दुधाच्या रास्त दरासाठी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

दूध खरेदीचे दर वारंवार कमी (Frequent reduction in milk purchase rates) केले जात असल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Milk producing farmers in the state) मेटाकुटीला आले आहेत. दूध व्यवसायातील (Milk business) अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दूध उत्पादकांना दिलासा मिळावा, यासाठी दूध उत्पादक आपल्या मागणीसाठी संघर्ष करत आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी काल क्रांतिदिनी सोमवारी संगमनेर तालुक्यातील मंगळापूर (Sangamner Taluka Manglapur) येथे शासनाचा निषेध (Protest the Government) करत गाढवाला दूध पाजून अनोखे आंदोलन (donkey by milking Movement) करून शासनाचे लक्ष वेधले.

शेतकर्‍यांना गायीच्या दुधाला (cow milk) प्रति लिटर 35 रुपये व म्हशीच्या दुधाला (Buffalo milk) प्रति लिटर 60 रुपये दर द्यावा, लॉकडाऊन (lockdown) काळात दूध कंपन्यांनी शेतकर्‍यांकडून 20 रुपये दराने दूध घेतले. शेतकर्‍यांना यामुळे खूप नुकसान सहन करावे लागले. शेतकर्‍यांचे नुकसान कमी करण्यासाठी लॉकडाऊन काळात दूध घातलेल्या शेतकर्‍यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्या (grants demand), दूध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना (Private and Co-operative Milk Unions) लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा, अशा विविध मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केल्या आहेत.

गेल्या दोन महिन्यापूर्वी देखील दूध उत्पादक संघर्ष समितीने आंदोलने केली होती. त्यानंतर त्या आंदोलनाची दखल घेत दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार (Dairy Development Minister Sunil Kedar) यांनी दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, शेतकरी संघटना प्रतिनिधी, दुध संघाचे प्रतिनिधींची बैठक घेवून सर्व मागण्या ना. केदार यांनी मान्य केल्या. मागण्यांसंदर्भात अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यावर पुढे काही कारवाई झाली नाही. तेव्हा मागण्या मान्य करुन सुद्धा त्याची अंमलबजावणी (Implementation) होत नाही, दिलेला शब्द हे सरकार पाळत नाही, या बाबीचा निषेध म्हणून गाढवाला दूध पाजून आंदोलन शेतकरी करत आहे. या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर शेतकर्‍याची ही पोरं रक्ताची क्रांती देखील करुन दाखवतील, असा इशारा शेतकरी नेते दिपक वाळे (Farmers Leder Deepak Vale Hint) यांनी दिला आहे.

आंदोलन कर्त्यांचे निवेदन मंडलाधिकारी बापूसाहेब ससे यांनी स्विकारले. यावेळी रमेश पवार, संजय सावंत, किरण वाळे, सोमनाथ भोकनळ, सोमनाथ वाळे, अर्जुन वाळके, मच्छिंद्र पवार, अमोल घुले, भाऊसाहेब वाळे, रामदास वाळे, निवृत्ती भोकनळ, दीपक हासे, अशोक वाळे, बाळासाहेब झिंजुर्डे, गेणू पवार, विकास हासे, गवराम वाळे, शिवाजी वाळे, रावसाहेब वाळे, ज्ञानदेव पवार, दिलीप वाळे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com