राहाता (तालुका प्रतिनिधी) -

साईबाबांच्या शिर्डीत सलग सुट्ट्यांमुळे देशाच्या विविध भागातून गर्दी झाली आहे . गेल्या 14 दिवसांत दिवसात कोरोनाच्या संकटात

फ़िज़िकल डिस्टन्सिंग पाळत सुमारे 2लाख पन्नास हज़ार भाविकांनी साईंच्या चरणी माथा टेकवत साईबाबांच्या झोळीत तब्बल 3 कोटी 23 लाख 98 हज़ार 208 रुपयांचे विक्रमी दान अर्पण केले आहे .

लॉकडाउननंतर प्रदीर्घ काळानंतर साईमंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी परिश्रम घेऊन करोनाच्या संकटाचा मुक़ाबला करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना साईमंदीर

परिसरात केल्या आहेत. साईसंस्थानकडून आलेल्या सुरक्षेविषयक उपाययोजनांबद्दल भाविकांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 15 डिसेंबर ते 28 डिसेंबर या काळातील 14 दिवसात साईबाबा मंदीरात तब्बल अडीच लाख भाविकांनी शिर्डीत येवून साईंच्या चरणी नतमस्तक होत साईंच्या झोळीत विक्रमी दानही अर्पण केले.

वर्षाअखेरीस 31 डिसेंबरला साई मंदिर राहणार खुले

भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या मागणीनंतर मंदिर राहणार खुले...

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक येतात साई दरबारी...

मंदिर स्वच्छेतेसाठी रात्री 11.25 ते 11.55 या वेळेत राहणार दर्शनासाठी बंद राहील शिर्डी साईबाबा संस्थानचा निर्णया मुळे साईभक्तांना दिलासा मिळाला आहे.

साई मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याने 31 डिसेंबर ची शेजारती आणि 1 जानेवारी रोजी काकड आरती रद्द करन्यात आल्याचे संस्थानच्या वतीने स्पष्ट करन्यात आले आहे.