अकोलेत कौटुंबिक हिंसाचाराच्या दोन घटना, गुन्हे दाखल

अकोलेत कौटुंबिक हिंसाचाराच्या 
दोन घटना, गुन्हे दाखल

अकोले (प्रतिनिधी) / Akole - अकोले तालुक्यात नवविवाहीतेला माहेरून फ्लॅट घेण्यासाठी 5 लाख रुपये आण, तुला स्वयंपाक नीट येत नाही. सोन्याचे दागिने घेऊन ये असे म्हणून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा टिटवाळा व चाकण पुणे येथील कुटुंबियांविरूध्द अकोले पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पहिल्या घटनेत रोहिणी निलेश डोंगरे (वय 22 वर्षे) रा. कौठे बुद्रुक ता. संगमनेर, हल्ली राहणार वाघापूर ता. अकोले यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली असून यात म्हटले आहे, फिर्यादी विवाहीता ही लग्न झाल्यानंतर सासरी टीटवाळा जि. ठाणे येथे नांदत असताना लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांतच पती निलेश सुदाम डोंगरे यांनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन 5 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तसेच भाया अशोक सुदाम डोंगरे, जाव दिपाली अशोक डोंगरे यांनी तुला स्वयंपाक नीट येत नाही असे म्हणून अपमानास्पद वागणूक देऊन तसेच सासू ताराबाई सुदाम डोंगरे, सासरे सुदाम निवृत्ती डोंगरे यांनी फिर्यादीस माहेरून पैसे आणत नाही म्हणून वाईट वाईट शिवीगाळ करून मारहाण केली. या फिर्यादीवरून अकोले पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 242/2021 भारतीय दंड संहिता कलम 498, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलिस नाईक के. एल. तळपे करत आहेत.

तर दुसर्‍या घटनेत आम्रपाली संतोष इथापे (रा. सावरगाव पाट, ता. अकोले) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, फिर्यादी महिला लग्न झाल्यानंतर सासरी चाकण (पुणे) येथे नांदत असताना लग्नानंतर एक महिन्यानंतरच मे 2014 पासून दोन ते जून 2020 रोजी पर्यंत सासू चंद्रभागा दत्तात्रय इथापे, सासरे दत्तात्रय तुकाराम इथापे (दोघे रा. म्हसवंडी ता. संगमनेर व रवींद्र दत्तात्रय इथापे, पती संतोष दत्तात्रय इथापे (सर्व राहणार, चाकण पुणे) यांनी नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आण व आणखी सोने घेऊन ये असे म्हणून फिर्यादीस वेळोवेळी वाईट वाईट शिवीगाळ करून मारहाण केली व घराबाहेर काढून दिले तसेच सर्वांनी फिर्यादीस शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून अकोले पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर 243/2021 भारतीय दंड संहिता कलम 498, 323, 504, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोंदे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com