कर्जत : डोंबाळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

कर्जत : डोंबाळवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने एकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यात खळबळ उडाली असून, शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

बबन बापू कुर्‍हाड (50, रा. डोंबाळवाडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोंबाळवाडी गावाच्या शिवारामध्ये बबन बापू कुर्‍हाडे, रघुनाथ मारुती मासाळ , दादा कोंडीबा मासाळ, नवनाथ जगन्नाथ मासाळ व इतर दोन नातेवाईक असे सर्वजण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. यापैकी बबन कुर्‍हाडे यांना बाजरीच्या शेतात हालचाल दिसली. आपल्या शेळ्या मेंढ्यांचे रक्षण करण्यासाठी जनावर हुसकावण्यासाठी दोघेजण बाजरीच्या पिकाच्या परिसरात जोरात ओरडून त्या अज्ञात प्राण्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत असताना, आकस्मात बिबट्याने बबन कुराडे यांच्या अंगावर झडप घातली व उजव्या हाताचा दंडाच्या लचका तोडला तसेच छातीच्या कडेला चावा घेतला.

दरम्यान शेजारी उभा असलेले रघुनाथ मासाळ यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तिथून पुन्हा बाजरीच्या पिकामध्ये उडी घेऊन पळून गेला. प्राथमिक उपचार करून कुर्‍हाडे यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले.

Related Stories

No stories found.