डोळासणेत महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने लांबविले

डोळासणेत महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने लांबविले

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील गुंजाळवाडी पठार येथील विमल जयवंत शिरसाठ या महिलेच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला आहे ही घटना सोमवार ता. 25 एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास डोळासणे पुलाजवळ घडली आहे.

याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, विमल शिरसाठ डोळासणे येथे आल्या होत्या. सोमवारी दुपारी डोळासणे पुलाजवळ आल्या असता त्याच वेळी अज्ञात चोरट्याने विमल यांना हाक मारून तो त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला की आजी मास्क का लावला नाही तसेच तुमच्या जवळील सोन काढून पिशवीत ठेवा असे म्हणल्यानंतर विमल यांनी गळ्यातील दागिने काढून ठेवले त्यानंतर पिशवीत काय आहे, असे म्हणत चोरट्याने पिशवीत हात घालून पिशवीतील 60 हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून पोबारा केला आहे.

याप्रकरणी विमल शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 119/2022 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आदीनाथ गांधले हे करत आहे.

Related Stories

No stories found.