डो-हाळे येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार

डो-हाळे येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार

ग्रामस्थ भयभीत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राहाता तालुक्यातील डो-हाळे गांवात काराला येथील जपे वस्तीनजीक मंगळवारी दिवसा ढवळ्या बिबट्या मुक्त संचार करतांना आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरीकांमध्ये दहशतीचे पसरली आहे.दरम्यान वनविभागाने सापळा रचून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राहाता तालुक्यातील गोदावरी कालव्याच्या सिंचन क्षेत्रात येणाऱ्या अस्तगांव, पिंपळस, कनकुरी, नांदुर्खी पाठोपाठ आता बिबट्याने आपला मोर्चा डो-हाळे गावातील काराला येथील परीसरात वळवला आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान रस्त्यावर जातांना अचानकपणे काही तरुणांना या बिबट्याने दर्शन दिले.यावेळी संबंधित तरुणांनी आपले चारचाकी वाहन उभे करून चक्क पाच ते सहा मिनिटे मोबाईलवर बिबट्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आणी तातडीने सोशल मीडियावर व्हायरल केले.

बिबट्या आल्याची माहिती मिळताच गावातील दुध उत्पादक शेतकरी व कामगार मंडळींनी अंधार होण्याअगोदर आपले घर गाठून छोटीमोठी जनावरे गोठ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे. या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याचे डो-हाळे गावचे सरपंच भाऊसाहेब डांगे यांनी सांगितले. याव्यतिरिक्त अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे असल्याची माहिती सरपंचांना कळविण्यात आली आहे.

त्यानुसार याठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.वनाधिकारी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन ठसे तपासणी करण्यासाठी येणार असल्याचे समजते. एकंदरीतच सदरचा परीसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाची व डाळींबाची शेती असून लपन आहे.अशातच सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र हिरवी दाट झाडी आणी गवत असल्याने बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com