'आजारातून बरे झाल्यावर एक झाड लावा'

'आजारातून बरे झाल्यावर एक झाड लावा'

अहमदनगर मधील डॉक्टरांचे प्रिक्रिप्शन व्हायरल

नाशिक | Nashik

कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

यातच अहमदनगर मधील डॉक्टरांची एक अनोखे प्रिस्क्रिप्शन व्हायरल होत आहे. यात डॉक्टरांनी औषधांसोबत एक झाड लावण्याचा सल्ला दिला आहे. हे अनोखे प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

अहमदनगर मधील संजीवनी हॉस्पिटल मधील डॉ. युवराज व कोमल कासार यांचे हे प्रिस्क्रिप्शन आहे. कालच्या त्यांच्या रुग्णाला त्यांनी औषधांसोबत एक झाडं लावण्याचा सल्ला दिला आहे.

हा सल्ला केवळ तोंडी नसून डॉक्टरांनी चक्क प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहिले, "आजारातून बरे झाल्यावर एक झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजनची कमी पडणार नाही."डॉक्टारांच्या या खास सल्ल्याची सध्या सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com