डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध

नगरमध्ये आज दुपारी दोनपर्यंत ओपीडी बंद
डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज (शुक्रवार) देशव्यापी निषेध दिन पाळण्यात येणार आहे. यामुळे आज सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळेत नगर शहरातील ओपीडी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. निसार शेख, डॉ. सतीश सोनवणे, उपाध्यक्ष डॉ. सागर झावरे, सहसचिव डॉ. अमित करडे, डॉ. सुरेद्र रच्चा आदी उपस्थित होते. डॉक्टरांवर हल्ले करणार्‍यांवर यापुढे उपचार केले जाणार नाहीत. रुग्णालयांना परिसर संरक्षित क्षेत्र घोषित करून संरक्षण वाढवावे, असा कायदा करण्यात आलेला आहे.

मात्र, त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. गेल्या 11 वर्षांत या कायद्याअंतर्गत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. निकालपत्र येईपर्यंत दोन किंवा तीनच केस गेलेल्या आहेत. गुन्हेगारांना ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने शिक्षा देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हा निषेध दिन पाळण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com