साडेचौदा लाख टन ऊस गाळप करून ‘ज्ञानेश्वर’ राज्यात चौथ्या स्थानी - नरेंद्र घुले

साडेचौदा लाख टन ऊस गाळप करून ‘ज्ञानेश्वर’ राज्यात चौथ्या स्थानी - नरेंद्र घुले

भेंडा |वार्ताहर| Bhenda

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा 47 वा गळीत हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत करोना महामारीच्या संकटावर मात करत शेतकी विभाग, कामगार, अधिकारी, ऊसतोड कामगार, मुकादम, संचालक मंडळ तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ज्ञानेश्वर कारखान्याने 214 गावचे कार्यक्षेत्रातील 14 लाख 51 हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून सहकारी कारखान्यामध्ये राज्यात 4 था क्रमांक पटकावला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली .

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 47 व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते विधीवत पूजा करून गव्हाणीत शेवटची ऊसाची मोळी टाकून झाली. यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाघ्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, तज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले पाटील, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सेक्रेटरी रवींद्र मोटे, नेवासा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, तुकाराम मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, अशोकराव मिसाळ, मुख्य शेतकी अधिकारी सुरेशराव आहेर, बबनराव भुसारी, मच्छिंद्र म्हस्के, गणेशराव गव्हाणे, दादा गंडाळ, प्रा. नारायण म्हस्के, अंबादास कळमकर, बबनराव जगदाळे, सखाराम लव्हाळे, पंडितराव भोसले, बबनराव धस आदी प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.

नरेंद्र घुले म्हणाले, ज्ञानेश्वर कारखान्याने या गळीत हंगामात 6 कोटी 61 लाख युनिट विज निर्माण करून निर्यात केली आहे. भविष्यात भागाचा विकास होण्यासाठी पाटपाणी, विज, रस्ते हे फार महत्वाचे आहे कारखान्यामुळे शेवगाव, नेवासा व पाथर्डी या भागात लाखो रुपयांची उलाढाल होऊन अनेकांना रोजगार उपलब्ध होतो म्हणून कारखाना या भागाची मातृसंस्थाच आहे.

परंतु हे वैभव टिकविण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी नदीत वळवून चार ते पाच जिल्ह्याला या पाण्याचा कायमस्वरूपी फायदा मिळून देण्याचे काम सरकारने भविष्यात अग्रक्रमाने केले पाहिजे.

यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर सीताराम चौधरी, चिफ इंजिनियर राहुल पाटील, डिस्टिलरी इंचार्ज महेंद्र पवार, स्टोअर किपर नामदेव मुळे, कामगार कल्याण अधिकारी बाळासाहेब डोहाळे, कारभारी गायके, कल्याणराव म्हस्के, संभाजीराव माळवदे, उपशेतकी अधिकारी नंदकुमार पाटील आदी उपस्थीत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com