भेंडा l वार्ताहर l भेंडा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया दि. 6 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यापासून पुढे सुरू करण्यात आली असून छाननी मध्ये 282 पैकी 134 अर्ज पात्र तर 148 उमेदवारी अर्ज निवडणुकीस अपात्र ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहनिंबधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांनी दिली.

शासनाने करोनामुळे कारखाना निवडणूक प्रक्रियेला आहे त्या टप्प्यावर स्थगिती दिली होती.राज्यात पुन्हा कोरोना अनलॉक सुरू झाल्याने सहकारी संस्थांच्या स्थगित केलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेल्या दि.4 जानेवारी पासून टप्प्या पासून सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिल्याने लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळी निवडणूक प्रक्रिया छाननीच्या टप्प्यावर सुरू करण्यात आली.संचालक मंडळाच्या 21 जागांकरिता एकूण 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.दि.6 जानेवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर व सहाय्यक निवडणूक अधिकारी देविदास घोडेचोर यांनी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी केली.तीन वर्षे ऊस पुरवठा न करणे,कारखाना व इतर सहकारी संस्थांची थकबाकी,ऊस पुरवठा कराराचा भंग(ऊसाची अन्य विल्हेवाट) या कारणांमुळे उमेदवारी अर्ज बाद झाले झालेत.

पात्र-अपात्र उमेदवारी अर्जाची संख्या अशी.....

गट--एकूण दाखल अर्ज--पात्र अर्ज संख्या--अपात्र अर्ज संख्या

शेवगाव गट-- 30--15--15

श.टाळकी गट--18 --06--12

कुकणा गट-- 38 --23--15

नेवासा गट-- 21--08--13

वडाळा गट-- 39--11--21

उत्पादक संस्था--10--06--04

अनु.जाती/जमाती-- 08--03--05

महिला राखीव-- 25--11--14

ना.मा.प्रवर्ग-- 41--27--14

भटके-विमुक्त -- 20--08 --12

एकूण 282--134 पात्र--148 अपात्र

दि.6 रोजी रात्री उशिरा पर्यंत छाननी सुरू होती. त्यामुळे पात्र/अपात्र उमेदवारांची यादी उपलब्ध होऊ शकली नाही. आज दि.7 रोजी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.